भरधाव बस-ट्रकची समोरा-समोर धडक : आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू


बाराबंकी : खाजगी प्रवाशांची वाहतूक करणारी बस व ट्रकची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेकजण जखमी झाले. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे हा अपघात झाला. बस आणि ट्रक समोरासमोरुन वेगाने येत होते, त्याचवेळी अचानक एक म्हैस समोर आडवी आल्याने दोन्ही वाहन चालकांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दोन्ही गाड्यांची एकमेकांना धडक बसली. किसान पथ रींग रोड येथे ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर परीसरात मोठा गोंधळ उडाला असून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली तर प्रवासी बसमधील नागरीकांनी मोठ-मोठ्याने रडायला सुरुवात केली.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती
प्रवाशांना पर्यटनासाठी घेऊन बस दिल्लीहून बहराइच येथे जात होती. त्याचवेळी, समोरून आलेल्या ट्रकला जोराची धडक बसली. या प्रवासी बसमध्ये 70 प्रवाशी होते तर ट्रकमधून वाळूची वाहतूक करण्यात येत होती. बस आणि ट्रकची धडक इतकी भीषण होती की, या दुर्घटनेत 8 जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती बाराबंकीच्या पोलीस अधिक्षकांनी दिली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून जखमींना तत्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस व प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !