जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पाच जवान शहीद


नवी दिली : जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले असून प्रत्युउत्तराम दोन दहशतवाद ठार मारले गेल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सैन्य दलाचे 4 जवान आणि जेसीओचा 1 जवान शहीद झाला आहे. चकमकीत हे पाचही जवान गंभीर जखमी झाले होते. मात्र, त्यानंतर, काही तासांनी त्यांना वीरमरण प्राप्त झालं. सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. या कारवायांना भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मात्र, सोमवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यामध्ये, 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. पूँछ जिल्ह्यातील चमरेर याठिकाणी जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सैन्य दलाला मिळाली होती. त्यानुसार, सुरक्षा जवानांनी मोहीम आखून या दहशतवाद्यांना गाठलं. चमरेर येथे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला होता. दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली, त्यामध्ये 5 जवान शहीद झाले असून दोन आतकंवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची प्राथमिक आहे.

जवानांची नावे : नायब सुभेदार जसविंदर सिंग, नाईक मनदीप सिंग व्हील, शिपाई गज्जन सिंग, शिपाई सूरजसिंग आणि शिपाई वैसाख एच. हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !