अकोल्यात गुन्हे शाखेच्या कारवाईत 51 लाखांचा गुटखा जप्त
अकोला : अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा यांच्या पथकाने बुधवारी मूर्तिजापूर येथे छापे टाकले. त्यात त्यांनी 45 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. दुसर्या दिवशी खडबडून जागे झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एमआयडीच्या हद्दीतील एका गोडावूनमध्ये छापा टाकला आणि 44 लाख 34 हजार 740 रुपयांचा गुटखा जप्त केला. सलग दोन दिवसांत पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच्या जवळपास गुटखा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी क्रमांक 3 येथे जावेद भाई गंगा नगर यांच्या मालकीचे साहील पीव्हीसी पाई ग्राईंडींग कारखान्याच्या बाजूला अग्रवाल यांच्या मालकीचे टिनाचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये वहीद खान याने गुटख्याची साठेबाजी केली होती. येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पालिसांनी छापा टाकला. या वेळी पोलिसांनी 44 लाख 34 हजार 750 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.
