ट्रक-बसचा भीषण अपघात : चौघे प्रवासी ठार
जयपूर : प्रवासी बसने ट्रकला दिलेल्या जोरदार धडकेत चार प्रवासी ठार झाले तर 24 हून अधिक प्रवासी जखमी झाला. हा भीषण अपघात राजस्थानच्या जयपूरमध्ये घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला.
मृतेदह शवविच्छेदनासाठी रवाना
मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रवासी बसने पाठीमागून ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसमध्ये बसलेले 24 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर, दुर्दैवाने या अपघातात 4 जणांचा मृत्यूही झाला आहे. पोलिसांनी या सर्वांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.




जयपूर-आग्रा महामार्गावर जाम
या अपघातानंतर जयपूर-आग्रा महामार्गावर बराच वेळ जाम झाला होता. अपघाताची माहिती मिळताच बस्सी, कानोटा आणि तुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. पोलिस व ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर चार रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांच्या मदतीने जखमींना बस्सी सीएचसी आणि एसएमएस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.