60 वर्षीय प्रौढाची आत्महत्या : चाळीसगाव तालुक्यातील घटना


चाळीसगाव : तालुक्यातील करगाव येथे 60 वर्षीय व्यक्तीने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी समोर आली. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. महादू सुरसिंग देवरे (60, करगाव, ता.चाळीसगाव) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथील महादू सुरसिंग देवरे (60) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी 10.15 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान,घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शाखाली पुढील तपास सहा.निरीक्षक रमेश चव्हाण हे करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !