उमाळा फाटा भागातून चोरट्यांनी महागडी कार चोरीस
जळगाव : तालुक्यातील उमाळा फाटा येथून पार्किंगला लावलेली कार अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कार चोरीने उडाली खळबळ
साकीब अली सैय्यद जाकीर अली (22, रा.मकरा कॉलनी, कुसुंबा शिवार, ता.जि.जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांच्याकडे (एम.एच.04 जी.डी.8219) क्रमांकाची टाटा इंडिगो कार आहे. शनिवार, 18 डिसेंबर रोजी रात्री 12.30 वाजता त्यांनी त्यांची कार कुसुंबा फाट्याजवळील औरंगाबाद-जळगाव रोडवर पार्किंग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंग लावलेली 95 हजार रुपये किंमतीची टाटा इंडिगो कार चोरून नेली. ही घटना रविवार, 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. साकीब अली यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गफुर तडवी करीत आहेत.




