महिंदळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सविता देसले विजयी


महिंदळे, ता.भडगाव : महिंदळे ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक चारमधील रीक्त जागेसाठी झालेल्या चुरशीच्या पोट निवडणुकीत सविता दगडू देसले यांचा 342 मतांनी दणदणीत विजय झाला तर सुनीता रवींद्र भदाणे 192 मते मिळवून पराभूत झाल्या.

राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक
महिंदळे ग्रामपंचायत गत निवडणुकीत सुनीता मोहन भदाणे या दोन जागांवर विजयी झाल्या होत्या त्यांनी एका जागेचा राजीनामा दिल्याने प्रभाग चार मध्ये एका जागेसाठी भदाणे पुरस्कृत नम्रता पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. या जागेसाठी 534 मतदारांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल. भदाणे परीवाराच्या उमेदवार सविता दगडू देसले 342 मतांनी विजयी झाल्या सरपंच मोहन भदाणे पुरस्कृत उमेदवाराचा दणदणीत विजय झाल्याने जल्लोष करण्यात आला. प्रकाश संभाजी भदाणे, शरद बाबुराव भदाणे, सुनील जगन भदाणे, डॉ.बाबुलाल सुकलाल भदाणे, अशोक बाबुराव भदाणे, रमेश शिवबा भदाणे, भाईदास देसले, भूषण देसले, अशोक देसले पुंडलिक भदाणे व सर्व भदाणे व देसले परीवाराचे व गावकर्‍यांचे सहकार्य लाभले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !