प्रवाशांनो इकडे लक्ष द्या : बिलासपूर विभागात रेल्वेचा ब्लॉक : 18 रेल्वे गाड्या रद्द
भुसावळ : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात चौथ्या लाईनच्या कनेक्टिव्हिटीचे काम सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामाचा थेट परीणाम प्रवासी रेल्वे गाड्यांवर होणार आहे. ब्लॉकमुळे भुसावळ विभागातून बिलासपूर विभागात जाणार्या तब्बल 18 रेल्वे गाड्या रेल्वे मंत्रालयाकडून 23 डिसेंबरपासून रद्द करण्यात आल्या.
या गाड्या झाल्या रद्द
भुसावळ विभागातून जाणार्या या गाड्या जेथून सुटतात तेथूनच दिलेल्या तारखांना सुटणार नाही. गाडी 12870 हावडा मुंबई 24 डिसेंबरला हावडा येथून सुटणार नाही, 12869 मुंबई-हावडा एक्स्प्रेस 26 डिसेंबरला रद्द, गाडी 12812 हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 24 व 25 डिसेंबरला रद्द, लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी 26 व 27 डिसेंबरला रद्द केली आहे. 22866 पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 28 डिसेंबरला रद्द तर लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्स्प्रेस ही गाडी 30 डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे. 12880 भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 23 व 27 डिसेंबरला रद्द तर एलटीटी-भुवनेश्वर ही गाडी 25 व 29 डिसेंबरला रद्द, गाडी 22512 कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी 25 डिसेंबरला तर लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या ही गाडी 28 डिसेंबरला रद्द करण्यात आली तसेच 12810 हावडा-मुंबई ही गाडी 26 तर मुंबई-हावडा एक्स्प्रेस ही गाडी 28 डिसेंबरला रद्द करण्यात आली. 12151 लोकमान्य टिळक टर्मिनस ते शालीमार एक्स्प्रेस ही गाडी 22, 23 व 29 तर शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 24, 25 व 31 डिसेंबर असे तीन दिवस रद्द आहे. गाडी 12949 पोरबंदर ते सांत्रागाची ही गाडी 24 व सांत्रागाची ते पोरबंदर ही गाडी 26 डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे. गाडी 22894 ही हावडा ते साईनगर शिर्डी ही गाडी 23 व 30 आणि साईनगर शिर्डी ते हावडा एक्स्प्रेस ही गाडी 25 डिसेंबर आणि 1 जानेवारी 22 या दिवशी रद्द करण्यात आली आहे.


