पिंप्राळ्यातील विवाहितेचा 15 लाखांसाठी छळ ; पाच जणांविरोधात गुन्हा
जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या 31 वर्षीय विवाहितेने माहेरहून प्लॅट घेण्यासाठी 15 लाख रुपये न आणल्याने पतीसह सासरच्यांनी छळ केला. छळ असह्य झाल्याने विवाहितेने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवल्याने पतीसह पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाचा आरोपींविरोधात गुन्हा
भारती चंदुलाल तायडे (31, रा.पिंप्राळा हुडको) यांचा विवाह 2017 मध्ये चंदूलाल नामदेव तायडे यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाच्या 15 दिवसानंतर पती चंदुलाल तायडे याने लग्नात हुंडा दिला नाही तसेच फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 15 लाख रुपये आणावे यासाठी तगादा लावला परंतु विवाहितेच्या आई-वडिलांची परीस्थिती हलाखीची असल्यामुळे पैशांची पूर्तता करू शकत नसल्याचे सांगितल्यावर पती चंदुलाल तायडे याने शिविगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच सासू, सासरे, दीर व नणंद यांनीदेखील पैशांसाठी टोमणे मारणे व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्या. बुधवार, 22 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पती चंदुलाल नामदेव तायडे, सासरे नामदेव शंकर तायडे, सासू भिकाबाई नामदेव तायडे, दीर प्रकाश नामदेव तायडे (सर्व रा.नगरदेवळा, ता.पाचोरा) आणि नणंद भारती संजय नरवेलकर (रा.पुणे) या पाच जणांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.




