वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या सहा.अभियंत्यांसह कर्मचार्यांना मारहाण
जळगाव : वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या सहाय्यक अभियंत्यासह त्यांच्या कर्मचार्यांना थकित वीजबिल धारकाकडून शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार गुरुवार, 23 रोजी सकाळी 11 वाजता सिंधी कॉलनी परीसरात घडला. याप्रकरणी टिकमदास परमानंद पोपटानी (सिंधी कॉलनी, जळगाव) याच्याविरोधात जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
अधिकार्यांसह कर्मचार्यांना मारहाण व दमदाटी
दीक्षितवाडी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता जयेश जनीकांत तिवारी यांच्यासह कार्यालयीन सहाय्यक योगेश शेषराव जाधव, तंत्रज्ञ नमो मधुकार सोनकांबळे, वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम लोंढे यांनी गुरूवार, 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जळगाव शहरातील जोशी कॉलनी, सिंधी कॉलनी, बाबानगर परीसरात थकीत वीज बिल धारकांना विज बिल भरण्याबाबत सुचना करण्यासाठी दुपारी दीड वाजता गेले. त्यावेळी सिंधी कॉलनी येथील वीज ग्राहक टिकमदास परमानंद पोपटानी (सिंधी कॉलनी) याने 75 दिवसांपासून विजबिल भरलेले नव्हते. सहाय्यक अभियंता जयेश तिवारी यांनी थकीत विज बील भरण्यासाठी सांगितले. याचा राग आल्याने ग्राहक टिकमदास पोपटानी याने लोखंडी टिकम घेवून अधिकार्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला तसेच दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सहाय्यक अभियंता तिवारी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी टिकमराव पोपटानी याच्यावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक प्रमोद फणसे करीत आहे.




