जळगावात शिक्षिकेचा विनयभंग ; एकाविरोधात गुन्हा


जळगाव : शहरातील एका भागात राहणार्‍या 22 वर्षीय शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिक्षिकेचा विनयभंग
शहरातील एका भागात 22 वर्षीय शिक्षिका आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास असून एका शाळेत शिक्षिका आहेत. . गेल्या दोन महिन्यांपासून अकील शरीफ खान (32, रा.जळगाव) हा शिक्षिकेचा पाठलाग करीत होता. बुधवार, 22 डिसेंबर रोजी पाठलाग करून आरोपीने महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिक्षिकेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तरूणाविरोधात तक्रार दिल्यावरून संशयीत आरोपी अकिल शरीफ खान (रा.शाहूनगर) याच्याविरोधात बुधवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक धनराज निकुंभ करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !