जळगाव जिल्ह्यात अपघातांची मालिका कायम : एरंडोलजवळ भीषण अपघात तिघे जागीच ठार

एरंडोल-कासोदादरम्यान भरधाव चारचाकीने दुचाकीला उडवले


एरंडोल : जळगाव जिल्ह्यात अपघातांची मालिका कायम असून वाहनांवरील वेग मर्यादेमुळेच अपघात सातत्याने घडत आहेत. भडगाव ते एरंडोल मार्गावर भरधाव कारने दुचाकीला उडविल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली.

अज्ञात चारचाकीने उडवले
एरंडोल ते भडगाव रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील बलदीप सुकटा पवार (32), बबलू बच्चन भोसले (22) आणि गोटू पिंटू चव्हाण (12) हे तिघे जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली तर अपघाताला कारणीभूत असलेल्या वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. अपघातप्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तिघे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.





जिल्ह्यात अपघात कायम : वेग मर्यादा गरजेची
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुसाट वेगांमुळे अपघातांची मालिका वाढली आहे. आधीच रस्त्यांच्या दुरवस्थेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतापाची भावना असतानाच भरधाव वाहनांच्या वेगावरही आता कुणाचे नियंत्रण नसल्याने त्याबाबतही आश्चर्य व्यक्त होताना दिसते. गेल्या दिड महिन्यांपासून एस.टी.चा संप सुरू असून जिल्ह्यात अवैध वाहतूक फोफावल्यानेही अपघात वाढले आहेत. मंगळवार, 21 रोजी जामनेरजवळ लाकूड वाहतूक करणार्‍या 407 वाहनाने अ‍ॅपे रीक्षाला धडक दिल्याने तीन प्रवासी जागीच ठार झाल्याची घटना घडली तर पुन्हा तीन दिवसाने अर्थात गुरूवारी लग्नाला जाणार्‍या भुसावळातील वर्‍हाडींच्या वाहनाला अपघात होवून नवरदेवाच्या मोठ्या भावासह चुलत बहिणीचा व ब्युटी पार्लर चालक विवाहितेचा मृत्यू झाला. दरम्यान, बेफाम वेगाने चालणार्‍या चारचाकी वाहनांसह डंपर, ट्रकवर अंकुश लावण्यासाठी वेग मर्यादचे नियम आणखीन कडक करून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जवाबदारी आता आरटीओ व पोलिस प्रशासनाची असल्याचा सूर सुज्ञ जनतेतून व्यक्त होत आहे.

  • अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या बालकाचा खून : आरोपी प्रेयसीसह प्रियकर सदस्य जाळ्यात 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !