धक्कादायक ! : मालेगाव शहरातून 30 तलवारी जप्त


मालेगाव : अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक व शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या टाकलेल्या छाप्यात पोत्यात भरलेल्या 30 तलवारी जप्त करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी सुमारे 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नवापुरा भागातील वरळी रोड परीसरात ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील वरळी रोड परिसरातील एका घरात तलवारींनी भरलेले पोते असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी शहर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मोहंमद बिलाल याच्या घरात तलवारींनी भरलेले पोते आढळून आले. पोलिसांनी बिलाल याच्यासह महेमुद अब्दुल रशीद व अन्य एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 हजार रुपये किमतीच्या 30 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश घुसर, हवालदार शेखर ठाकूर, पंकज डोंगरे, विशाल गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक सावंत, अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, हवालदार वसंत महाले, भूषण खैरनार, संदीप राठोड आदींच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घुसर हे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !