चंद्रकांत दादा पाटील म्हणाले ; राज्यात राष्ट्रपती राजवट लावा


मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर टीका केली. राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायचा असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट स्वीकारावी, असे आव्हानच त्यांनी अशोक चव्हाण यांना दिले आहे.

सर्व जवाबदारी केंद्रावर ढकलणे योग्य नाही
मार्च 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही आघाडी सरकारने ओबीसींचा इम्पिरीकल डेटा गोळा केला असता तर आतापर्यंत हा प्रश्न सुटला असता पण आपण काहीही करायचे नाही आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलायची असे आघाडी सरकारचे धोरण आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !