चंद्रकांत पाटलांच्या विधानावर शरद पवार म्हणाले ; असे विधान करणार्‍यांना माझ्या शुभेच्छा !


सातारा : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून सर्वच कारभार केंद्राकडे द्या, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाल्यानंतर या विधानाचा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेत असे विधान करणार्‍यांना माझ्या शुभेच्छा असल्याचा चिमटा शरद पवार यांनी काढला आहे. सातार्‍यात छत्रपती शिवाजी कॉलेज येथील लोकनेते रामशेठ ठाकूर भवनचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते पार पडले. या कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, चेअरमन अनिल पाटील, रयत कौन्सिलचे रामशेठ ठाकूर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मीडियाशी संवाद साधताना पवारांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले. राष्ट्रपती लागवट लागू करण्याबाबत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे पवार म्हणाले.

सरकारला क्लिअरकट मेजॉरीटी
राज्यातील विधीमंडळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थिर आहे. या सरकारला क्लिअरकट मेजॉरीटी आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी स्थिर सरकार देण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. म्हणूनच ते अशी विधानं करत आहेत, अशी विधाने याआधीही केली गेली होती. त्याचा काही पाीणाम झाला नाही, अशा पद्धतीच्या विधानांना नागरीक गांभीर्याने घेत नाहीत, असा टोलाही पवारांनी लगावला.



शरद पवारांच्या या विधानानंतर पिकली खसखस
दरम्यान, या कार्यक्रमात रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी मदतीचा 2 कोटी 50 लाखाचा धनादेश रयतचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. रामशेठ ठाकूर आतापर्यंत अनेक शैक्षणिक संस्थांना मदत केली असल्याचे सांगत शरद पवार यांनी रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी त्यांनी माझं गणितच कच्चं आहे. आकडे माझ्या लक्षात रहात नाहीत त्यामुळे मी कधीच कॉमर्समध्ये अ‍ॅडमिशन घेतलं नाही मात्र ठाकुरांसोबत बोलायचं असेल तर आकडे लक्षात ठेवावेच लागतात, असं ही शरद पवार यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !