शिवसेना पदाधिकार्‍यांकडून पिस्टल व तलवार रोखून हल्ला : अ‍ॅड.रोहिणी खडसे

मुक्ताईनगर पोलिसात शिवसेना पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा : अ‍ॅड.रोहिणी म्हणाल्या ; हल्ल्याने खचणार नाही, आणखी जोमाने काम करणार !


मुक्ताईनगर : हळद समारंभावरून मुक्ताईनगरकडे निघालेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान संचालक अ‍ॅड.रोहिणी खडसे (Add.Rohini Khadse) यांच्या वाहनावर सहा हल्लेखोरांनी हल्ला केल्याची संतापजनक घटना सोमवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहराजवळील मानेगाव फाट्याजवळ घडली होती. या घटनेनंतर मुक्ताईनगरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. दरम्यान, अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिली असून शिवसेना पदाधिकार्‍यांनी पिस्टल (Pistal) व तलवार रोखून आपल्यावर हल्ला केल्याचे त्यात म्हटले आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील काशीनाथ पाटील व चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी मुक्ताईनगर तहसीलबाहेर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले आहे.

हल्ल्याला बोदवडमधील वादाची किनार
अ‍ॅड.रोहिणी खडसे (Add.Rohini Khadse) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत पूर्व प्रचारादरम्यान राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील व आपणास मुक्ताईनगरातील छोटू भोई, अफसर खान, वरणगावचे समाधान महाजन यांनी आपल्याला धक्काबुकी व दमबाजी केली होती. त्यानंतर 24 डिसेंबर रोजी आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी जावून महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी आम्ही गृहमंत्री व पोलिस अधीक्षकांना छोटू भोई यांचे अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात निवेदन दिले होते व त्यामुळेच त्यांचा माझ्याविषयी प्रचंड राग होता.



मानेगाव फाट्याजवळ पिस्टल व तलवार रोखली
अ‍ॅड.रोहिणी खडसे (Add.Rohini Khadse) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, चालक सचिन पाटील, स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे, यांच्यासोबत फॉर्च्युनर (एम.एच. 19 सी.सी.1919) सोमवारी रात्री साडेसात वाजता चांगदेव येथे भगवान भोई यांच्या मुलीचा हळद कार्यक्रम असल्याने तेथे भेट दिली व तेथून कोथळीमार्गे मुक्ताईनगराकडे येत असताना मानेगाव फाटा सोडल्यानंतर अर्धा किलोमीटर अंतरावर अचानक तीन दुचाकी आल्या व त्यांनी आपल्या वाहनापुढे त्या आडव्या लावल्याने चालकाने वाहन थांबवले. यावेळी सुनील काशीनाथ पाटील याने वाहनाच्या डाव्या बाजूने येवून पिस्टल रोखले तर चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांच्या हातात तलवार चकाकाली तर छोटू भोई याच्या हातात लोखंडी रॉड (Iron Rod) होता. आरोपींनी आपण बसलेल्या दिशेने काचेवर जोरात आघात केल्याने काच फुटला तसेच बोनटचे नुकसान झाले. या प्रकारानंतर आपण प्रचंड घाबरलो व चालकाने (Driver) तातडीने तेथून गाडी काढली व आपण पोलिस निरीक्षक राहुल खताळ (PI Rahul Khatal) यांना घडलेली घटना कथन केली.

शिवसेना पदाधिकार्‍यांसह सात आरोपींविरोधात गुन्हा
अ‍ॅड.रोहिणी खडसे (Add.Rohini Khadse)यांच्या फिर्यादीनुसार, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील काशीनाथ पाटील व चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांच्यासह अन्य चार अनोळखींविरोधात मुक्ताईनगर पोलिसांनी (Muktainagar Police) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !