बोदवडमध्ये भगवा फडकल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटलांची सूचक प्रतिक्रिया ; म्हणाले…


बोदवड : बोदवड नगरपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (mla chandrakant patil) यांच्या नेतृत्वात भगवा भडकल्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास मतदारांनी शिवसेनेला एकहाती सत्ता दिली आहे. आता बोदवडचा विकास झाल्या शिवाय राहणार नाही. जळगाव जिल्ह्यातील एकमेव निवडणूक झाल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले होते मात्र शिवसेनेने आपले वर्चस्व निर्माण केले असल्याचे गुलाबराव पाटील (gulabrao patil) म्हणाले आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !