बोदवडच्या निकालावर नाथाभाऊ स्पष्टच म्हणाले ; सेना-भाजपाने केली छुपी युती !


बोदवड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत (bodwan nagarpanchayat election) शिवसेना आमदार चंदक्रांत पाटील (mla chandrakant patil) यांच्या नेतृत्वात शिवसेनेने सत्ता काबीज केली. या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे (eknathrav khadse) यांच्या राष्ट्रवादी पक्षाला अवघ्या सात जागांवर समाधान मानावे लागल्याने खडसेंसाठी ही बाब धक्का असल्याचे मानले जात असताना निकालाबात माजी मंत्री खडसे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, आम्हाला नऊ ते दहा जागांवर यश मिळेल, अशी खात्री होती मात्र शिवसेना व भाजपाची छुपी युती या निवडणुकीत दिसून आली. निवडणुकीच्या दोन दिवस आधी भाजपाचे गिरीश महाजन (mla girish mahajan) व आमदार चंद्रकांत पाटील (mla chandrakant patil)यांनी भेटदेखील घेतली, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या पराभवासाठी सार्‍यांची एकजूट
बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वांनी मिळून राषट्रवादीचा पराभव कसा होईल यावर ताकद खर्ची केल्याचे माजी मंत्री खडसे (eknathrav khadse) म्हणाले. बोदवड नगरपंचायत (bodwad nagarpanchayat) ही राष्ट्रवादीकडे नसतांना आम्ही चांगले प्रयत्न केले. येथे शिवसेना व भाजपची छुपी युती असतांनाही आम्हाला दहा जागा मिळतील, असे वाटत होते मात्र तसे झाले नाही. एक जागेवर ईश्वरचिठ्ठीने भाजपा उमेदवार विजयी झाला तर काही जागांवर ठरावीक मतांनी आमचे उमेदवार पराभूत झाल्याचेही नाथाभाऊंनी (eknathrav khadse) सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !