समाजात वाढलेले घटस्फोट चिंतनीय बाब : कुटुंबनायक रमेश पाटील

भुसावळात लेवा समाजाच्या वधू-वर सूचीचे प्रकाशन


भुसावळ : समाजात वाढलेले घटस्फोट हे चिंतनीय बाब आहे. मुलींच्या संसारामध्ये आई-वडिलांचा तसेच सोशल मीडियाचा वाढता प्रभाव याला कारणीभूत असून वधू-वरांच्या आई-वडिलांनी सबुरीने घ्यावे, असा सल्ला भोरगाव लेवा पंचायतीचे कुटूंबप्रमुख रमेश विठू पाटील यांनी दिला. श्री सद्गुुरु झेंडूजी महाराज बेळीकर लेवा पाटीदार समाज संस्थेतर्फे रविवारी खडका रोडवरील महालक्ष्मी मंदिरात वधू-वर परीचय सुचीचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी सुधीर पाटील होते. समाज मंडळाचे अध्यक्ष दिनेश भंगाळे, माजी नगरसेवक किरण कोलते, सुरेश देवकर, दीपक धांडे, अरुण धांडे, अ‍ॅड. नरेंद्र लोखंडे, मनोहर बर्‍हाटे, अरविंद कुरकुरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाज मंडळातर्फे वार्षिक वधू-वर पररचय पुस्तिका
2021-22 चे प्रकाशन करण्यात आले.



आई-वडिलांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे घटस्फोट अधिक
कुटूंबनायक रमेश पाटील म्हणाले की, सध्या समाजामध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे, ही चिंतनीय बाब आहे. नववधू वरांच्या संसारात दोघांच्या आई-वडीलांनी अधिक लक्ष न देता जरा सबुरीने घ्यावे. मुला-मुलींच्या संसारात आई-वडिलांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे घटस्फोट अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, संत परंपरेचा आदर्श घ्या सकल लेवा या संकल्पनेवर वारकरी संप्रदायाचे आद्यगुरु श्री सद्गुरु झेंडूजी महाराज यांनी समानतेचे बीज रोवण्यास प्रथम सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी त्यांचे आवडते सहकारी शिष्य श्री धनजी महाराज भुसावळकर यांच्याकडे तो वारसा दिला. परंपरेने ते आता पुढे चालू आहे कार्य करावे, असे मत यावेळी सुधीर पाटील यांनी व्यक्त केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !