खासदार उन्मेश पाटलांबद्दल आक्षेपार्ह लिखाण : दोषींवर कारवाईबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष यांची जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी


जळगाव : भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यालय, रींग रोड हॉटेल सायली समोरील आमदार राजूमामा भोळे यांच्या निवासस्थानाबाहेर तसेच आमदार राजुमामा भोळे यांच्या स्टेडियम कॉम्प्लेक्सजवळील जनसंपर्क कार्यालयाबाहेर रात्री बारा वाजता अज्ञात व्यक्तींनी टाटा हरीरअर चारचाकी वाहनातून येऊन चार महिला व चार पुरुषांनी या ठिकाणी गलिच्छ आणि शिवराळ भाषेत रांगोळीने लिखाण केले आहे. या लिखाणातून आमचे नेते खासदार उन्मेश पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजु मामा भोळे यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. अज्ञात समाजकटंकांविरुद्ध गंभीर कारवाई करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

नेत्यांच्या जिवाला धोका
निवेदनाचा आशय असा की, आमच्या नेत्यांच्या बाबत या अज्ञात व्यक्तींना वेगळ्या स्वरूपाचे काहीतरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या लिखाणातून आमच्या नेत्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. म्हणून सदरील लिखाण करणारे जे कोणी अज्ञात व्यक्ती असतील त्यांची सखोल चौकशी होवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच झालेल्या प्रकाराबद्दल तातडीने कारवाई करावी अन्यथा कार्यकर्त्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यास त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील. अन्यथा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते लोकशाही मार्गाने पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील, असे भाजपा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !