दोंडाईचा शहर खुनाने हादले : डोक्यात लोखंडी रॉड मारून तरुणाचा खून
दोंडाईचा : दोन तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर एकाने दुसर्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने तरुणाचा मृत्यू झाला. शहरातील गोपालपुरा भागात शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेत अरुण संतोष तिरमले (25, रा.गोपालपुरा, दोंडाईचा) (arun santosh tirmale, dondaycha) या तरुणाचा मृत्यू झाला तर या प्रकरणी सागर तिरमले या तरुणाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शिविगाळ करताना वाद
गोविंद नगरातील रहिवासी असलेल्या सागर राजेंद्र तिरमले (sagar rajendra tirmale) याचा अरुण तिरमले याच्याशी झालेल्या शाब्दीक वाद धक्काबुक्कीवर पोहोचल्यानंतर सागरने अरुणच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकल्याने अरुण गंभीर जखमी झाला. त्याला कॉटेज रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ राहुल भाईदास तिरमले (21) यांच्या फिर्यादीवरून सागर तिरमलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


