साकळीच्या तरुणाची आत्महत्या


यावल : तालुक्यातील साकळी येथील मोहम्मद इसा तडवी (२१) या तरुणांने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, १७ रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

घरातच घेतला गळफास

मोहम्मद तडवी हा आई,वडील, दोन भाऊ यांच्यासह साकळी येथील इंदिरा नगर भागात वास्तव्याला होता. आई, वडिल तसेच लहान दोघ भाऊ यांच्यासह मोहम्मद हा मजुरी करून घरातील चूल पेटवण्यासाठी मदत करत होता. गुरुवारी आई,वडिल,भाऊ हे सर्वजण मोल मजुरीच्या कामाला गेले असतांना मोहम्मदने आपल्या घरात साडी गळ्याला बांधून घराच्या छताच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. दुपारच्या सुमारास साडेतीन वाजेच्या सुमारास लहाण भाऊ हमीद हा जेवणासाठी घरी आल्यावर त्याने मोठा भाऊ मोहम्मद हा घरात लटकलेल्या अवस्थेत असल्याचे पाहिले व आजु बाजूला आरडाओरड करून लोकांना बोलविले असता लोकांनी बघितले असता तो मृत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच यावलचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाचपोळे करीत आहेघरातच घेतला गळफास
मोहम्मद तडवी हा आई,वडील, दोन भाऊ यांच्यासह साकळी येथील इंदिरा नगर भागात वास्तव्याला होता. आई, वडिल तसेच लहान दोघ भाऊ यांच्यासह मोहम्मद हा मजुरी करून घरातील चूल पेटवण्यासाठी मदत करत होता. गुरुवारी आई,वडिल,भाऊ हे सर्वजण मोल मजुरीच्या कामाला गेले असतांना मोहम्मदने आपल्या घरात साडी गळ्याला बांधून घराच्या छताच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. दुपारच्या सुमारास साडेतीन वाजेच्या सुमारास लहाण भाऊ हमीद हा जेवणासाठी घरी आल्यावर त्याने मोठा भाऊ मोहम्मद हा घरात लटकलेल्या अवस्थेत असल्याचे पाहिले व आजु बाजूला आरडाओरड करून लोकांना बोलविले असता लोकांनी बघितले असता तो मृत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच यावलचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाचपोळे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !