चोरीच्या उद्देशाने फिरणारे पाच संशयीत पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : शहरातील मेहरूण स्मशानभूमी व एमआयडीसी परीसरात घरफोडी व चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या पाच संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहरातील मेहरुण स्मशानभूमीजवळ आणि एमआयडीसी परीसरातील जुनी ट्रायडंट कंपनीजवळ चोरी, घरफोडी करण्याच्या उद्येशाने काही संशयित फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना शुक्रवारी 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी रात्री 8 वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित आरोपी सलमान अजीम तडवी (25), सुनील शेषमल चव्हाण (24), तुषार डिगंबर सासवडे (30), महावीर किशोर जैन (31) आणि शोएब बेग मुश्ताक बेग (26, सर्व राहणार रामेश्वर कॉलनी, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.






यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, प्रदीप पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील, इम्रान सैय्य्द, मुदस्सर काझी, योगेश बारी, साईनाथ मुंढे यांनी केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !