महिंदळेतील शेतकर्याचा विहिरीत पाय घसरल्याने मृत्यू
महिंदळे, ता.भडगाव : गावातील दिलीप वामन भदाणे (55) हे सकाळच्या सुमारास शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता विहिरीत पाणी बघतांना तोल गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. गरीब कुटुंबातील व मनमिळाऊ स्वभावाचे (दादाजी) यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली.
शेतात घडली दुर्घटना
मुलगा वनविभागात नोकरीला असल्यामुळे तो घरी आला होता. त्यामुळे पत्नी व मुलगा यांना लग्नाला पाठवले व ते शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले. विहिरीला कठडे नसल्यामुळे विहिरीत किती पाणी आहे हे पाहण्यासाठी गेले असता मातीवरून पाय घसरल्याने ते विहिरीत पडले. विहीर पूर्ण दगडाची असल्यामुळे व विहिरीत कमी पाणी असल्यामुळे त्यांच्या डोक्यास दगडाचा जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. मुलगा लग्न समारंभ आटोपून दुपारी घरी आल्यावर वडील अजून घरी आले नाहीत म्हणून फोन केला परंतु फोन बंद येत असल्यामुळे शेतात जाऊन पहिले शेतातही दिसलें नाहीं. विहिरीत पहिले असता ते विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. गावात वार्ता कळताच गावकर्यांनी त्यांना विहिरीतून बाहेर काढून भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या बाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली,





