पोहण्यासाठी गेलेल्या धामणगावच्या तरुणाचा बुडाल्याने मृत्यू


जळगाव : तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील धामणगाव येथील २० वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीला आली आहे. या घटनेची तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षय राजू सपकाळे (20, रा. धामणगाव, ता. जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे.

तापी नदीवरील दुर्घटना
अक्षय सपकाळे हा आई, वडील आणि तीन बहिणीसोबत वास्तव्याला आहे. आई व वडील शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात. तर अक्षय हा शहरातील एका कापड दुकानात काम करत होता. दरम्यान, रविवार, २० फेब्रुवारी रोजी अक्षय हा सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत धामणगाव जवळ असलेल्या तापी नदीवर पोहण्यासाठी गेले. पाण्यात पोहत असतांना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. अक्षय तापी नदीत बुडत असल्याचे लक्षात आल्याने मासे पकडणारे पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्याला पाण्याबाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासले असता त्याला मयत घोषीत केले. यावेळी धामणगावातील मित्र परिवार यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी मयत अक्षयच्या नातेवाईकांसह मित्रांनी एकच आक्रोश केला. एकुलता एक मुलगा गेल्या सपकाळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. मयतच्या पश्चात आई, वडील आणि तीन बहिणी असा परीवार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !