विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू


जळगाव : पाणी तापविण्याच्या हिटरचा शॉक लागल्याने योगेश्वर नगरातील ५३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता घडली. या घटनेबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुशमा प्रकाश महाजन (53, रा. कालिंका माता मंदिराजवळ, योगेश्वर नगर, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.

शॉक लागल्याने मृत्यू
सुष्मा प्रकाश महाजन (५३) या आपल्या पती प्रकाश पंढरीनाथ महाजन, एक मुलगा आणि मुलगीसह वास्तव्यास होत्या. दैनंदिनीप्रमाणे प्रकाश महाजन हे रविवार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मंदीरात देवाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्याच्या पत्नी सुष्मा महाजन यांनी अंघोळीला पाणी तापविण्यासाठी लोखंडी बादलीत हिटर लावले होते. थोड्या वेळाने पाणी तापले की नाही हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला त्यात त्या जागीच मयत झाल्या. प्रकाश महाजन हे मंदीरातून घरी आल्यानंतर ही घटना लक्षात आली. शेजारच्यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषीत केले. या घटनेबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पती प्रकाश महाजन, मुलगा आणि मुलगी असा परीवार आहे. प्राथमिक तपास हवालदार रघुनाथ महाजन आणि अनिल कांबळे करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !