पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ : जिवंत जाळण्याची धमकी देणार्या पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा
जळगाव : व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये न आणल्यास जिवंत जाळून टाकेल, अशी धमकी विवाहितेला देणार्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल
शहरातील गेंदालाल मिल परीसरातील माहेर असलेल्या रुखसार बी.शकीलखान मुलतानी (30) यांचे मेहरुण परीसरातील अक्सा नगरातील रमाबाई आंबेडकर मराठी शाळेजवळील रहिवासी शकील खान सिकंदर खान मुलतानी यांच्याशी विवाह झाला. पतीसह सासरच्या मंडळींकडून व्यापारासाठी विवाहितेने माहेरुन पाच लाख रुपये आणायला लावले परंतु पैसे न आणल्याने विवाहितेचा मानसिक व शारीरीक छळ करण्यात आला तसेच जिवंत जाळल्याची धमकी देण्यात आली. हा त्रास असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. मंगळवारी त्यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरुन पती शकील खान सिकंदर खान मुलतानी, सासू शहनाजबी सिकंदरखान मुलतानी, नणंद शाहिस्ता शेहबाज खान, शबनमबी जाकीर खान, दीर शगीरखान सिकंदर खान, जाकीर खान सिकंदर खान (सर्व रा.अक्सानगर, मास्टर कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुनील बडगुजर करीत आहे.





