कैद्याचा पोलिस शिपायावर हल्ला नंतर स्वतःवरही केले वार : जळगाव कारागृहातील घटना


जळगाव : अंगझडती घेण्याचा राग आल्यानंतर कैद्याने जळगाव कारागृहातील पोलिस शिपायाला शिविगाळ करून अरेरावी केली व नंतर हल्ला करत स्वत:वरही वार करून घेतल्याची धक्कादायक घटना बुधवार, 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी हल्ला करणार्‍या कैद्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस शिपायासह स्वतःवरही केला हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा कारागृहात पोलिस शिपाई राम घोडके हे सुभेदार सुभाष खरे, कुलदीपक दराडे, निवृत्ती पवार, नीलेश मानकर , रामचंद्र रोकडे, सीताराम हिवाळे हे बुधवारी सायंकाळी सहा वाजता बॅरेकमध्ये जाऊन कैद्यांची अंगझडती घेत होते. यादरम्यान एका बॅरेकमध्ये कैदी सचिन दशरथ सैंदाणे याची अंगझडती घेण्यासाठी गेले. त्याने अंगझडतीला विरोध करत कर्मचार्‍यांना अरेरावी करत शिवीगाळ व धक्काबुक्की केली त्यानंतर लोखंडी पत्रा कर्मचार्‍याला मारत स्वत च्या डोक्यात पत्र्याने वार करून घेतल दुखापत करून घेतली.






जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा
घटनेची माहिती मिळाल्यावर सर्कल जेलर एस.पी पवार यांनी कारागृहात भेट दिली तसेच गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हापेठ पोलिसांना पत्र दिले. याप्रकरणी पोलिस शिपाई राम घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैदी सचिन सैंदाणे याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन सैंदाणे हा शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात 25 सप्टेंबर 2016 पासून जळगाव जिल्हा कारागृहात असल्याची माहिती समजते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !