मुद्रांक व नोंदणी कार्यालयात गोळीबाराने खळबळ : दोघे जखमी
बीड : शहरातील मुद्रांक व नोंदणी कार्यालयात शुक्रवार, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेत दोघे जखमी झाले आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
यांच्यावर झाला गोळीबार
सतीश बबन क्षीरसागर (30, लक्ष्मणनगर, बीड) व फारूक सिद्दीकी (28, जालना रोड, बीड) अशी जखमींची नावे आहेत. ते दोघे शुक्रवार, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी येथील मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. यात दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जमिन व्यवहारातून गोळीबाराचा संशय
उपअधीक्षक संतोष वाळके, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक रश्मीता एन.राव, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली असून जमिनीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
