जळगावातील या वर्षातील हेल्प फेअर 4 आणखीन रंजक होणार ‘हॉबी डुबी डू’च्या सहभागाने


जळगाव : शहरात होत असलेला सेवा महोत्सव अर्थात मल्हार हेल्प फेअरला अधिक उपयुक्त, अधिक रंजक केले जाणार आहे. त्यात पहिल्यांदाच साकारत असलेल्या हॉबी डुबी डू या विभागाने.

20 संस्थांचा समावेश
या विभागात हॉबी , छंद क्षेत्रात कार्य करणार्‍या विविध विषयातील निवडक 20 संस्थांचा या वेळी समावेश करण्यात येणार आहे. संगीत, डान्स, आर्ट, क्राफ्ट, खेळ, सायन्स, भाषा, पर्यावरण, कुकिंग इ. विविध विषयाच्या सहभाग असणार आहे. याचा फायदा येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःसाठी तसेच पालकाला त्यांच्या पाल्यासाठी होणार आहे.






सेवाभावी संस्थांचा समावेश
हेल्प फेअर या प्रदर्शनीत जिल्ह्यातील व बाहेरील विविध क्षेत्रात कार्यरत अशा 50 सेवाभावी संस्थांचा समावेश केला जातो. सेवाभावी संथांच्या कार्याला वाव देणे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे, तरुणांना, विध्यार्थ्यांना सेवेचं, दातृत्वाचे संस्कार मिळावे, त्यांच्या हाताने दातृत्व घडावं, समाजातील विषमता त्यांना समजावी व उद्याच सुंदर विश्र् निर्माण करण्यात त्यांना हातभार लागावा हे हेल्प फेअरचे मुख्य उद्दीष्टे आहेत. हेल्प फेअरच्या हॉबी डुबी डू विभागात सहभागी होण्यासाठी कृपया हेल्प फेअर टीम अथवा हॉबी डुबी डू च्या मोना तडवी किंवा संतोष नन्नवरे 9326513777 यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !