कौटुंबिक वादातून पत्नीचा खून : थोरगव्हाणमधील आरोपी पतीची कोठडीत रवानगी


यावल : कौटुंबिक वादातून तालुक्यातील थोरगव्हाण येथील इंदुबाई प्रकाश पाटील (65) या वृद्ध विवाहितेचा संशयीत आरोपी तथा पती असलेल्या प्रकाश पांडुरंग पाटील (68) याने डोक्यात लाकडी दांड्याने वार करीत खून केला. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली व त्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिसात हजर झाल्याने त्यास अटक करण्यात आली. संशयीताला सोमवारी न्या.व्ही. एस.डामरे यांच्या न्यायासनापुढे हजर 3 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

संतापाच्या भरात डोक्यात मारला लाकडी दांडा
पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घटनास्थळ गाठून लाकडी दांडा हस्तगत करीत खुनाची घटना जाणून घेतली. पत्नीकडून सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने संतापाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती आरोपी पतीने पोलिसांना दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !