अमळनेरात घरफोडी : 55 हजारांचा मुद्देमाल लंपास


Amalner Gharphodi अमळनेर : बंद घरांना चोरट्यांना टार्गेट करीत चोर्‍या सुरू केल्याने नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. शहरातील सिंधी कॉलनीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड मिळून सुमारे 55 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सिंधी कॉलनीत बंद घर फोडले
किशोर लालचंद डावरणी हे शहरातील सिंधी कॉलनीत वास्तव्यास आहेत. रविवार, 27 फेब्रुवारी 2022 रोजी 11.50 ते सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 रात्री 2.00 वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने डावराणी यांच्या घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने घरातील 10 हजाराची रोकड, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील काप व 5 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या धातूच्या बाह्या असा एकूण 55 हजाराचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार सुनील राजाराम पाटील हे करीत आहेत.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !