पिंपळकोठा गावातील दुचाकीस्वार आयशर धडकेत जागीच ठार
एरंडोल : भरधाव आयशरने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात पिंपळकोठा (ता.एरंडोल) गावातील दुचाकीस्वार शिवम बाप्पू हटकर (22) हा जागीच ठार झाला. हा अपघात पिंपळकोठा गावाजवळ शुक्रवारी दुपारी घडला. या अपघातात कुटुंबातील एकुलता एक मुलगा जागीच ठार झाल्यानंतर कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.
भरधाव आयशरची दुचाकीला धडक
शिवम बापू हटकर (22, रा.पिंपळकोठा, ता.एरंडोल) पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी (एम.एच.19 डी.जे.1204) मध्ये पेट्रोल भरण्यासाठी पिंपळकोठा गावाहून जळगावकडे असलेल्या एका पेट्रोल पंपावर गेला असता परतीच्या प्रवासात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता गावाकडे येत असतानाच भरधाव आयशर क्रमांक (एम.एच.48 ए.वाय. 4951) ने जोरदार धडक दिल्याने शुभम हटकर हा जागीच ठार झाला तर दुचाकीही चक्काचूर झाली. एरंडोल पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.






