आय.टी.इंजिनिअर तरुणींनी शॉर्टस घातल्याने बेदम मारहाण : पोलिसांनी केली अशी कारवाई
पुणे : शॉर्ट्स घालून फिरत असल्याच्या कारणावरून आयटी इंजिनिअर तरुणींना चपलेने मारहाण करणार्या शेजारी महिलेसह सहा जणांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अलका किसन पठारे, शीतल कमलेश पठारे, सीमा बाळासाहेब पठारे, सचिन किसन पठारे, केतन बाळासाहेब पठारे, किरण सचिन पठारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयीत स्वतःहून झाले हजर
या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले आरोपी शनिवारी न्यायालयात स्वत:हून हजर झाले. अटकेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. मारहाण करणार्या महिलेला तरुणींच्या घर मालकीनेही समजावून सांगितले होते मात्र महिलेने कुटुंबातील इतर सदस्यांशी संगनमत करून तरुणींना मारहाण केल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली होती.





