कुर्हा येथे विठ्ठल लहरी जंगी ‘शंकर पटाचे’ उद्घाटन
मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्हा येथे शिवसेनेतर्फे शिवजयंतीनिमित्त विठ्ठल लहरी जंगी शंकर पटाचे शेतकर्यांच्या मनोरंजनासाठी आयोजन करण्यात आले. उद्घाटन मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती यामिनी चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. दरम्यान, मंगळवारी जागतिक महिला दिन असल्याने महिलांना स्पर्धेच्या उद्घाटनाची संधी दिल्याबद्दल संजना चंद्रकांत पाटील यांनी आयोजकांचे आभार मानले.
यांची होती उपस्थिती
यावेळी संजना चंद्रकांत पाटील, कल्पना पालवे, शिवसेना उपतालुका प्रमुख नवनीत पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजी पाटील, मुक्ताईनगरचे नगरपंचायतीचे नगरसेवक संतोष मराठे, युनूस खान, आरीफ आजाद, नूर मोहम्मद, मुकेश वानखेडे, इच्छापुर सरपंच गणेश थेटे, पुंडलिक सरक, काशीनाथ वानखेडे, पांडुरंग तांबे, कुर्बान तडवी, उपसरपंच खवले, पंकज पांडव, सतीश नागरे, बाळू पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विनोद पाटील, उल्हास पाटील, योगेश मुळक, रशीद तडवी, श्रावण धांडे, संदीप घाईट, संदीप डीवरे, युवा सेना शहरप्रमुख अविनाश वाडे, पंकज धाबे, राहुल खिरळकर, रीतेश मूळतकर, दिलीप कांडेलकर, छोटू पाटील, आयोजक गोपाळ गवळे, संतोष पवार, किशोर धामोडे, योगेश काकडे, अक्षय गव्हाळे, नरेश ठाकूर, संतोष कुकलारे, ऋषिकेश सुशीर, गोपाल बोरसे, सुनील जुमडे उपस्थित होते. स्पर्धेसाठी दादा पाटील, सुरेश लखाटे यांचे सहकार्य लाभले.


