लष्करातील जवानाचा लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार : या शहरातील घटना
जत : लष्करातील जवानाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार (rape) केला. याप्रकरणी जवानाविरोधात उमदी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने फिर्याद दाखल केल्यानंतर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जत तालुक्यातील एका गावातील पीडीता रहिवासी आहे.
पीडीता उच्च शिक्षित
जत तालुक्यातील 22 वर्षीय तरुणीही महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर पुणे येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गेली होती. तरुणीचे आई-वडील हे ऊसतोडणी मजूर आहेत. पुणे येथे पीडित तरुणी व जवानाची दीड वर्षांपूर्वी ओळख झाली. फोनवरून बोलणे सुरू झाले. सुट्टीवर आल्यानंतर त्याने पीडित तरुणीस सांगली येथे स्वतःच्या बुलेटवरून नेले.





फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाखल झाला गुन्हा
विश्रामबाग येथील लॉजवर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्यानंतर जत येथील लॉजवर नेऊन पुन्हा बलात्कार केला. पीडित तरुणीने त्याच्या मागे वर्षांपासून लग्नाचा तगादा लावला होता. सध्या तो सुट्टीवर गावी आला आहे. मागील वर्षभर त्याने टोलवाटोलवी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अखेर पीडित तरुणीने उमदी पोलीस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीचा फिर्याद दिली आहे.
