जुन्या वादातून कोयत्याने मारहाण : एका आरोपीला अटक
जळगाव : जुन्या भांडणाच्या रागातून जानकीनगरातील तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी संशशीत दर्शन अभिमान चौधरी (गणेश वाडी, जळगाव) यास अटक करण्यात आली असून त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे तर अन्य एका अल्पवयीनास नोटीस बजावली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे.
तिघांनी केला होता हल्ला
शहरातील जानकी नगरातील रहिवासी गोपाल सोनवणे याचे त्याचा मित्र भुषण नावाच्या तरुणासोबत भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात ठेवून शुक्रवार, 11 मार्च रोजी गोपाल याला अल्पवयीन मुलगा व दर्शन अभिमान चौधरी *दोन्ही रा. गणेशवाडी) तसेच कुणाल कोळी (जैनाबाद) या तिघांनी घरात घुसुन बेदम मारहाण केली. यादरम्यान अल्पवयीन मुलाने कोयता गोपाल याच्या डोक्यावर मारला तर भांडण सोडविण्यास गोपालचे वडील गेले असता त्यांच्या डोक्यात वीट मारुन त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते. तिघांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल होता.
गोपनीय माहितीवरून एकास अटक
पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील, सुधीर साळवे, योगेश पाटील यांच्या पथकाने संशयीदर्शन अभिमान चौधरी यास गणेश वाडी, जळगाव येथून अटक केली. अल्पवयीन मुलास नोटीस बजावण्यात आली असून कोयता जप्त करण्यात आला. तपासी अंमलदार हवालदार योगेश सपकाळे करीत आहेत.


