पुन्हा चोरट्यांनी लांबवली दुचाकी
जळगाव : शहरातील नवीपेठ परीसरातून तरुणाची 25 हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरीचे सत्र कायम
जयराज प्रकाश पवार (30, पोलिस कॉलनी, जळगाव) हा तरुण शनिवार, 12 मार्च रोजी दुपारी 12 वाजता खाजगी कामानिमित्ताने दुचाकी (एम.एच.19 सी.डी. 2416) ने शहरातील नवीपेठ भागातील सुभाष को-ऑपरेटीव्ह बँकेसमोर आल्यानंतर त्याने दुचाकी पार्क केली मात्र काम आटोपल्यानंतर परत आला असता दुचाकीची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शनिवार, 12 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.





