औषध विक्रेत्या व्यावसायीकावर चॉपरने हल्ला : शिरसोतील घटना


जळगाव : औषधांचे पैसे मागितल्याचा रागातून औषध विक्रेत्या दुकानदारावर चॉपरने हल्ला करून जखमी करण्यात आले. ही धक्कादायक घटना शिरसोली येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे नरेंद्र अमत खलसे (26) यांचे शिरसोली येथे औषध विक्रीचे (मेडिकल) आहे. शुक्रवार, 11 मार्च रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास गावातील निलेश अरुण पाटील हा मेडीकल दुकानावर आल्यानंतर त्याने पेन किलरच्या गोळ्या घेतल्या आणि निघून जात असतांना मेडीकल दुकानदार नरेंद्र खलसे यांनी औषधीचे पैसे मागितल्याचा निलेशला राग आल्याने त्याने हातातील चॉपरने नरेंद्र खलसे यांच्यावर हल्ला चढविला. नरेंद्र यांच्या गळ्याच्या खाली गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या नरेंद्र यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी निलेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार जितेंद्र राठोड करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !