रावेरात आघाडी सरकारचा निषेध : फडणवीसांना बजावलेल्या नोटीसीही केली होळी
रावेर : शहरातील भाजपा कार्यालयासमोर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसीची रविवारी सकाळी होळी करून आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, पंचायत समितीचे माजी सदस्य जुम्मा तडवी, पी.के.महाजन, धनगर नेते संदीप सावळे, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील, सी.एस.पाटील आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
भुसावळात फडणवीसांना बजावण्यात आलेली नोटीस जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध


