देवेंद्र फडणवीस स्टींग प्रकरणाची सीआयडी चौकशी : गृहमंत्र्यांची घोषणा

सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा घेतल्याची सभागृहाला गृहमंत्र्यांनी दिली माहिती


Dilip Walse Patil मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 125 तासांचे फुटेज असलेला पेन ड्राईव्ह विधानसभेत सादर करून केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी खळबळ उडाली होती. फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर या स्टींग प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील  (Dilip Walse Patil) यांनी सोमवारी सभागृहाला दिली. या प्रकरणातील वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांचाही राजीनामा घेण्यात आला असल्याची माहिती वळसे पाटील  (Dilip Walse Patil)  यांनी दिली.

कुणाचीही पाठराखण करणार नाही
फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना वळसे पाटील म्हणाले की, मुंबईत 1993 मध्ये बॉम्बस्फोट झाले. त्यात अनेकांना शिक्षा झाल्या. आता इतक्या जुन्या प्रकरणात हे प्रकरण सीबीआयकडे (cbi) पाठवण्याची आवश्यकता नाही. फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह सगळे दिलेले नाहीत. काही राखून ठेवले आहेत. परंतु, तुमचा आरोप काही असला तरी सुद्धा मी कोणाची पाठराखण करणार नाही, हे प्रकरण तपासावे लागेल. या घटनेच्या मागे कोण आहे? आणि ही घटना कशापद्धतीने पुढे घेऊन जायची?, यात कोण संबंधित आहेत? त्याच्यावर काय कारवाई करायची?, हे पाहावे लागेल, असे वळसे पाटील  (Dilip Walse Patil)  म्हणाले.



पेन ड्राइव्हचा तपास करणार- दिलीप वळसे पाटील
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर आरोप करत आज दुसर्‍यांदा विधानसभेत पेन ड्राइव्ह सादर केला. हा दुसरा पेन ड्राइव्ह आहे. यावर बोलताना गृहमंत्री वळसे पाटील  (Dilip Walse Patil)  म्हणाले की, या पेन ड्राइव्हचा (Pen Drive) तपास करण्यात येणार असून या प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची चौकशी सीआयडीला देण्याचा निर्णय जाहीर करतो.

नवाब मलिक यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत आहे- वळसे पाटीस
नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या संदर्भातील आरोपांवर बोलताना वळसे पाटील  (Dilip Walse Patil)  म्हणाले की, मलिक हे केंद्र सरकारच्या धोरणांवर आवाज उठवत होते. तो आवाज बंद करण्यासाठी जुना मुद्दा उकरून काढण्यात आला आहे. फडणवीस, आपण या राज्याचे 5 वर्षे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतात. त्यावेळी आपण तपास केला असता तर बरं झालं असतं. मात्र अन्यायाविरोधात बोलताना एखाद्याला अडकवलं जातं आणि त्याच्या विरोधात षडयंत्र केलं जातं आणि तुम्ही आम्हालाच म्हणता की आम्ही षडयंत्र करतो, अशा शब्दात वळसे पाटील  (Dilip Walse Patil)  यांनी फडणवीसांवर पलटवार केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !