बोदवड शहरातून चोरलेली दुचाकी अमळनेर तालुक्यात सापडली : पथकाला पाहताच चोरटे पसार


अमळनेर : तालुक्यातील इंद्रापिंप्री येथील ग्राम सुरक्षा पथकाने बोदवड येथून चोरीस गेलेली दुचाकी पकडण्यात यश मिळवले. दुचाकीवरील तीन संशयित जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले.

गस्तीदरम्यान पळाले चोरटे
14 रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास जानवेकडून येणार्‍या दुचाकीवर तीन संशयित येत होते. पथकाने थांबवून तिघांची चौकशी केली. परंतु त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने पथकाने अमळनेर पोलिसांशी संपर्क साधल्याने संशयीत दुचाकी सोडून पसार झाले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !