फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्लांची कसून तीन तास चौकशी


IPS Officer Rashmi Shukla मुंबई : फोन टॅपिंग आणि पोलिस बदली घोटाळ्याप्रकरणी तीन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी केली. याच प्रकरणात गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांची बुधवारी पोलिसांनी तीन तास झाडाझडती घेतली.

तीन तास कसून चौकशी
शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) कुलाबा पोलिस ठाण्यात (kulaba police station) आल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या दूरध्वनीचे बेकायदा टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. शुक्लांवर 1 एप्रिलपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश हायकोर्टाने दिले होते. त्याच वेळी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla)यांनी 16 व 23 मार्चला जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांसमोर हजर राहावे, असेही कोर्टाने स्पष्ट केले होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !