पोलिस चौकीला ‘बार’ बनवून पार्टी करणार्‍या पोलिसांवर आयुक्तांकडून कारवाईचा उतारा


Police Commissioner Deepak Pandey नाशिक : पोलिस चौकीतच मद्य पार्टी करणार्‍या रघुनाथ ठाकूर, सुरेश जाधव, मयूर सिंग, सागर बोधले या चार पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी दिले आहेत. या प्रकरणाची विभागीय चौकशीही होणार आहे. गंगापूर पोलिस ठाण्यांंतर्गत दादोजी कोंडदेवनगर पोलिस चौकीत (Dadoji Konddevnagar Police Station) चौघा पोलिसांनी मद्य पार्टी केल्याने पोलिस प्रशासनावर सर्व स्तरावरून टिकेची झोड उठली होती.

तक्रार करणार्‍यांनाच पोलिसांकडून मारहाण
याबाबत पोलिस आयुक्त पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांच्या माहितीनुसार, डीकेनगर येथील गार्डनमध्ये मद्यपी तरुण अश्लील चाळे करत असल्याची तक्रार देण्यासाठी नागरिक डीकेनगर पोलिस चौकीत गेले होते. मात्र, येथे पोलिस मद्य प्राशन करत असल्याचे दिसले. दोघा पोलिसांनी एका नागरीकाला मारहाण केली.

नागरीकांनी मद्य पार्टीचे केले चित्रीकरण
काही नागरीकांनी चौकीतील मद्याच्या बाटल्या, भरलेले ग्लास आणि खाद्यपदार्थांचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. हा प्रकार बघून संशयित पोलिसांनी पळ काढला. हा प्रकार आमदार सीमा हिरे यांनी पोलिस आयुक्तांना कळवला. त्यांनी तत्काळ उपआयुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, वरीष्ठ निरीक्षक रीयाज शेख यांनी दखल घेण्याचे सूचित करताच संबंधितानी धाव घेत पाहणी केली. बुधवारी सकाळी उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांनी चौघांवर निलंबनाची कारवाई केली.

65 चौक्या अनधिकृत
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील 72 पैकी 65 पोलिस चौक्या अनधिकृत असल्याचा गौप्यस्फोट पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी केला. राजकीय दबावामुळे तत्कालीन अधिकार्‍यांनी पोलिस महासंचालकांची मान्यता न घेता या चौक्या सुरू केल्याचे सांगत तीन महिन्यांत या चौक्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी नागरिकांना दिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !