बीएचआरच्या 25 लाखांपर्यंतच्या 20 टक्के ठेवी जूनपर्यंत मिळणार


जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट या अवसायनातील पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवी परताव्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार मार्च ते जून या कालावधीत 25 लाखांपर्यंतच्या ठेवींची 20 टक्के रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती अवसायक चैतन्यकुमार नासरे यांनी दिली आहे.

भुसावळातील मद्यपी चालकांसह रॅश ड्रायव्हींग करणारे चालक आज पोलिसांच्या ‘रडारवर’

पतसंस्था अवसायनात
बीएचआर पतसंस्थेने ठेवीदारांना केवायसी जमा करण्याचे आवाहन केलेले होते. ही संस्था अवसायनात असल्याने मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज अ‍ॅक्ट 2002चे कलम 90नुसार ठेवीदारांना प्रथमत: संस्थेकडे ठेव रकमेची मागणी करणे आवश्यक आहे. संस्थेतर्फे कायद्यानुसार प्राधान्य क्रमाने ठेवी परताव्याचे कामकाज करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना ठेव रकमेपैकी प्रथम टप्पा प्रो-रेटनुसार 20 टक्के रकमेचे वाटप सुरू आहे. वैद्यकीय, ज्येष्ठ नागरीक, लग्नकार्य, शैक्षणिक, ग्राहक मंच आदेशानुसार अशा व्यक्तींना त्यांच्या ठेव रकमेच्या व संस्थेच्या नियमानुसार परतावा देणे सुरू आहे.






केवायसी फॉर्म जमा करण्याचे आवाहन
ठेवीदारांनी मूळ ठेव पावती व क्लेम फॉर्म संस्थेत जमा केल्यास त्यांना संस्थेच्या नियमाप्रमाणे ठेवीच्या मूळ रकमेपैकी प्रथम टप्पा 20 टक्के रक्कम दिली जाते आहे. अद्यापही बहुतांश ठेवीदारांनी त्यांच्या केवायसी संस्थेत जमा केलेली नाही. केवायसी फॉर्म जमा न करणार्‍या ठेवीदारांच्या ठेवी परताव्याबाबत निर्णय घेता येणार नाही.

भरधाव झायलो उलटली : चिंचखेड्यातील इसम जागीच ठार, सहा सहा प्रवासी गंभीर जखमी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !