नात्याला कंलक : आई-वडिलांना मारहाण करणार्या मुलाविरोधात गुन्हा
पारोळा : तालुक्यातील शिरसमणी येथे शेतीच्या वादातून पोटच्या मुलाकडून आई-वाडीलांना शिवीगाळ करून काठीने मारहाण करून दुखापत करण्यात आली. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात मुलासह सुन व नातवांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शेती नावावर करण्यासाठी लावला तगादा
पारोळा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ राजाराम पाटील (85, रा. शिरसमणी, ता.पारोळा) हे आपल्या पत्नी साखरबाईसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा महादू दशरथ पाटील हा पत्नी व मुलांसह वेगळा राहतो. दरम्यान, शेती नावावर करून द्यावी अशी मागणी मुलगा महादू याने आई-वडीलांकडे तगादा लावला होता. शेती नावावर करत नसल्याच्या रागातून महादू दशरथ पाटील याने 19 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आई-वडील त्यांच्या घरी ओट्यावर बसलेले असतांना महादूने वडीलांच्या डोक्यात काठी मारल्याने दुखापत केली तर महादूची पत्नी संगिताबाई, मुलगा योगेश आणि गणपत यांनी साखरबाई यांना शिविगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.





यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी दशरथ पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून मुलासह सून व नातवांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संयिीत आरोपी महादू दशरथ पाटील, सुन संगीता महादू पाटील, नातू योगेश महादू पाटील आणि गणपत महादू पाटील (सर्व रा.शिरसमणी) यांच्या विरोधात पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सुधीर चौधरी करीत आहे.
