अल्पवयीन मुलीला पळविले : डांभर्णूीच्या आरोपीविरोधात गुन्हा
जळगाव : तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी एकाविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून शुक्रवार, 18 मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी होती. संशयीत आरोपी भुषण तुकाराम कोळी (रा.डांभूर्णी, ता.यावल) याने तिला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करीत मुलीचे वडीलांनी तक्रार दिल्याने संशयीताविरोधात नशिराबाद पोलिीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.
a


