डिझेल चोरटे जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


जळगाव : डिझेल चोरी करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी परीसरातून ताब्यात घेतले. त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी देऊळगाव राजा, जि.बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तानाजी मेंजा शिंदे (31, रा.खामकरवाडी, ता.वाशी, जि.उस्मानाबाद) व त्याचा साथीदार राहुल मधुकर काळे (20, रा.सरमकोंडी ता. वाशी जि. उस्मानाबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे डिझेल चोरीच्या प्रकरणातील संशयीत जळगाव एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, अशोक महाजन, अश्रफ शेख, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, मुरलीधर बारी यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर दोघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींना बुलढाणा येथील देऊळगाव राजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !