16 कलमी कार्यक्रमांतर्गत डांभूर्णी जि.प.शाळा प्रथम
यावल : तालुक्यातील डांभुर्णी जिल्हा परीषद प्राथमिक शाळेने 16 कलमी कार्यक्रमांतर्गत यावल तालुक्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे. यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील जिल्हा परीषद शाळा प्रथम आल्याने बुधवार, 23 मार्च रोजी ग्रामस्थ व सामाजीक संस्थांच्या माध्यमातून संबंधितांचा सत्कार केला जाणार आहे.
जि.प.शाळांमध्ये प्रथम येण्याचे उद्दिष्ट
आता या पुढील उद्दिष्ट जळगाव जिल्ह्यात जिल्हा परीषदेच्या शाळामंध्ये प्रथम येण्याचा संकल्प असल्याने शिक्षक आणि संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत. त्यासाठी त्यांचा उत्साह वाढावा व इतर शाळांना ही त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी या विचारातून अगोदर मिळवलेल्या यशाचं कौतुक आणि अभिनंदन झालं पाहिजे आणि म्हणूनच शाळेच्या या सर्वांगीण सुधारणे कामी ज्या ग्रामस्थांनी, शिक्षकांनी, राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी योगदान दिले आहे त्यांचा बुधवार, 23 मार्च रोजी स्वयंदीप प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


