कुर्‍हा व्यापारी संघटनेतर्फे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांचा सत्कार


मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्‍हा येथील व्यापार्‍याची गुजरातमधील अहमदाबाद येथील एजंटने 12 लाख 37 हजारांची फसवणूक केली होती. या प्रकरणी जलद गतीने तपास करीत आरोपीला अटक करण्यात यश आल्याने मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांचा व्यापारी संघटनेतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.

व्यापार्‍यांनी मानले प्रशासनाचे आभार
कुर्‍हा येथील योगेश राधेश्याम चौधरी यांचे योगेश ट्रेडर्स नावाचे आहे. मका व तुरीची कुर्‍हा परीसरातून ते खरेदी करून व्यापार्‍यांना विक्री करतात तस जमा झालेले धान्य अकोला, खामगाव व मलकापूर येथे पाठवतात. योगेश चौधरी यांचे मामा योगेश अग्रवाल (मूर्तिजापूर) यांचा सुद्धा आडत व्यवसाय असून त्यांनी गतवर्षी गुजरात येथील एजंट जिग्नेश जैन उर्फ दिनेश शहा यास धान्याची विक्री केली होती तर एजंटला कुर्‍हा येथील योगेश चौधरी यांनी सुद्धा 31 जानेवारी रोजी 25 टन मका विक्री केला व मालाचे पैसे बँक खात्यावर टाकण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले मात्र खात्यात पैसे टाकण्यात न आल्याने व फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर, नाईक नितीन चौधरी, कॉन्स्टेबल रवींद्र धनगर पठार यांनी गुजरात येथून जिग्नेश जैन यास अटक केली होती व योगेश चौधरी यांचे मक्याचे 12 लाख 37 हजार रुपये परत मिळाल्याने व्यापार्‍यांनी समाधान व्यक्त करीत या कामगिरीची दखल म्हणून निरीक्षक खताळ यांचा सत्कार केला. यावेळी कुर्‍हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष योगेश दालमिया, योगेश चौधरी, अजय चौधरी आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !